ध्येय

समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तथा इतरही सर्वसमावेशक विकास करणे.

उद्देश

समाजातील प्रत्येक व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे.

मूल्य

कुठल्याही प्रकारची सामाजिक दरी न ठेवता समाजाला उपयुक्त असे सामाजिक कार्य करणे.

पंचसूत्री

शैक्षणिक सक्षमीकरण:

डोंगराळ आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके, गणवेश, स्कूल बॅग, सायकल आणि इतर शालेय आवश्यक वस्तू मोफत वितरित करणे. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर भर देणे, त्यांना शाळेपर्यंत पोचण्यासाठी सायकली वाटप करणे असा उपक्रम संस्था नेहमी राबवते.

महिला सक्षमीकरण व आरोग्य:

महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, पोषण आहार जनजागृती, प्रशिक्षण व स्वयंरोजगार सल्ला, स्वयंपाक प्रशिक्षण तसेच महिलांना इतर व्यवसाय सुरु करण्यास मदत करणे.आहे.

सामाजिक ऐक्य

आदिवासी, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रतपासणी, रक्तदान शिबिरे, कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर वाटप.

पर्यावरण-दिन अवचित उपक्रम:

वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, पर्यावरणपूरक सामाजिक कार्यक्रम नियमित राबवले जातात.

कला, क्रिडा आणि प्रेरणादायी शिबिरे:

विद्यार्थ्यांसाठी कला, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व, गणित, विज्ञान स्पर्धा, खेळाची शिबिरे आणि गुणगौरव उपक्रम आयोजीत करणे.

दैनंदिन मदत व सामाजिक बांधिलकी:

गरीब, निराधार, अपंग, वृद्ध, विधवा यांना अन्नधान्य, कपडे, औषधे, जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदतीचे वाटप. संकटकाळात तात्काळ मदत.